Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeकोरोना७५ टक्के प्रौढ नागरिकांचे लसीकरण पूर्ण कोरोनाविरुद्धची लढाई अधिक बळकट होतेय

७५ टक्के प्रौढ नागरिकांचे लसीकरण पूर्ण कोरोनाविरुद्धची लढाई अधिक बळकट होतेय


नवी दिल्ली (वृत्तसेवा) संपूर्ण जगभरात दहशत निर्माण करणार्‍या कोरोनाची लढाई सुरूच आहे. हा लढा अधिक बळकट करण्यासाठी लसीकरण मोहीम जोरात राबविण्यात येत आहे. या संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी फार महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की, भारतातील ७५ टक्के प्रौढ व्यक्तींना लसीकरणाचे दोन्ही डोस मिळाले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिलेल्या माहितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त करत ट्वीट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी जनतेचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले, ७५ टक्के प्रौढ लोकसंख्येला संपूर्ण लसीकरण झाले आहे. या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल सर्व देशवासीयांचे अभिनंदन. तसेच ते पुढे म्हणाले की, आमची लसीकरण मोहीम यशस्वी करणार्‍या सर्वांचा मला अभिमान आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशातील एकूण लसीकरणांची संख्या १,६५, ७०, ६०, ६९२ वर पोहोचली आहे. यावर आनंद व्यक्त करताना आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्वीट केले की, सबका साथ, सबका प्रयास’ या मंत्राने, भारताने आपल्या ७५ टक्के प्रौढ लोकसंख्येला लसीचे दोन्ही डोस देण्याचे ध्येय गाठले आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपण अधिक बळकट होत आहोत. आपण सर्व नियमांचे पालन केले पाहिजे आणि लवकरात लवकर लस घ्यावी.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!