Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeबीडआतापर्यंत १०३ शिक्षक निघाले पॉझिटिव्ह आज आढळले ४३ बाधीत

आतापर्यंत १०३ शिक्षक निघाले पॉझिटिव्ह आज आढळले ४३ बाधीत


बीड (रिपोर्टर)- सध्या बीड जिल्ह्यात कोरोना संथ गतीने वाढत आहे. रोज ५० ते १०० च्या जवळपास रुग्ण आढळून येत आहेत. दिवाळीच्या खरेदीनंतर जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट होतो की काय, अशी भीती तज्ञांकडून व्यक्त होत होती. मात्र आता केवळ ५० ते १०० च्या मध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. सध्या नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. रोज शिक्षकांच्या कोरोना टेस्ट घेतल्या जात आहेत. आतापर्यंत १३ शिक्षक बाधीत आढळून आले असून आज आलेल्या अहवालात ४३ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
आतापर्यंत अंबाजोगाईमध्ये ११८८ शिक्षकांच्या तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये १५ जण पॉझिटिव्ह आले. आष्टीत ११८९ तपासण्यात १५ जण पॉझिटिव्ह आले. बीडमध्ये २१३४ तपासण्यांमध्ये १८ पॉझिटिव्ह आले. धारूरमध्ये ३५६ तपासण्यात दोन जण पॉझिटिव्ह, गेवराईमध्ये ८३६ तपासण्यात १४ जण पॉझिटिव्ह, केजमधील ९७२ तपासण्यात १३ पॉझिटिव्ह, परळीत १०६६ तपासण्यांमध्ये १४ पॉझिटिव्ह, पाटोदा ४८० तपासण्यात ४ पॉझिटिव्ह, शिरूर ४८१ तपासण्यात ५ पॉझिटिव्ह तर वडवणी तालुक्यात २३६ तपासण्यांमध्ये एक शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आला आहे. अजूनही १४९ शिक्षकांचे अहवाल आरोग्य विभागाला येणे बाकी आहे तर आज आलेल्या अहवालामध्ये अंबाजोगाईत ८, आष्टीत १२, बीड ६, धारूर १, गेवराई २, केज ३, माजलगाव २, परळी ३, पाटोदा ३ आणि वडवणीत ३ रुग्ण आढळून आले आहेत.

Most Popular

error: Content is protected !!