Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeक्राईमपिंपरगव्हाण शिवारात हिंस्त्र प्राण्याचा मेंढीवर हल्ला

पिंपरगव्हाण शिवारात हिंस्त्र प्राण्याचा मेंढीवर हल्ला

पिंपरगव्हाण शिवारात हिंस्त्र प्राण्याचा मेंढीवर हल्ला
वनविभागाने जावून पाहणी केली, अफवा न पसरवण्याचे केले आवाहन
बीड (रिपोर्टर)ः- बीड तालुक्यामध्ये बिबट्या नाही असा निर्वाळा वनविभागाच्यावतीने देण्यात आलेला आहे. रात्री पिंपरगव्हाण शिवारातील एका मेंढीवर हिंस्त्र प्राण्याने हल्ला करुन जखमी केले. सदरील हा हल्ला लांडग्यांने केला असावा असा अंदाज आहे. आज सकाळी वनविभागाच्यावतीने त्या ठिकाणी जावून पाहणी केली. लोकांना अफवा न पसरविण्याचे आवाहन करण्यात आले.
बारामती जिल्ह्यातील मेंढपाल बीड जिल्ह्यामध्ये आलेले आहे. त्यांच्या मेंढ्या पिंपरगव्हाण शिवारातील शेतामध्ये बसवण्यात आलेले आहे. रात्री यातील एका मेंढीवर हिस्त्र प्राण्याने हल्ला चढविला. यात ति जखमी झाली. याबाबत वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जात होत्या. बिबट्याची चर्चा केली जात होती. मात्र बीड तालुक्यात बिबट्या नाही असा निर्वाळा वन विभागाने आधिच दिलेला आहे. तरी ही काही जण अफवांना बळी पडत आहे. आज सकाळी वन-विभागाने ज्या ठिकाणी मेंढीवर हल्ला झाला त्या ठिकाणी जावून पाहणी केली. मेंढीवरचा हल्ला बिबट्याचा नाही तर इतर हिंस्त्र प्राण्याचे असल्याचे त्यांनी सांगितले. लोकंानी अफवा पसरवू नये आणि अफवांना बळी पडू नये असे वनविभागाच्या वतीने करण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!