Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeमहाराष्ट्रमराठवाडाऔरंगाबादेत मतमोजणीला सुरुवात ७८ तालुक्यातील मतदान अन् ३५ उमेदवारांमुळे निकाल रात्री उशिरापर्यंत

औरंगाबादेत मतमोजणीला सुरुवात ७८ तालुक्यातील मतदान अन् ३५ उमेदवारांमुळे निकाल रात्री उशिरापर्यंत

औरंगाबादेत मतमोजणीला सुरुवात
७८ तालुक्यातील मतदान अन् ३५ उमेदवारांमुळे निकाल रात्री उशिरापर्यंत
औरंगाबाद (रिपोर्टर)- अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी परवा मतदान झाल्यानंतर आज सकाळी आठ वाजता औरंगाबाद येथील कलाग्राम एमआयडीसी चिखलठाणा येथे मतमोजणीला सुरुवात झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यातल्या मतपेट्या एकत्रित करणे, बॅलेट पेपर जुळवणे याला वेळ लागत असल्याने आज मध्यरात्रीपर्यंत निकाल येण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत तब्बल ३५ उमेदवार असल्याने आणि ७८ तालुक्यात मतान झाल्याने प्रत्येक जिल्ह्याच्या मतपेट्या एकत्रित करण्याचे काम आज सकाळी मतमोजणी दरम्यान ८ वाजता सुरू झाले. मतपेटीतील मतपत्रिका एकत्रित करण्यास सुरुवात झाली असून ही मतमोजणी औरंगाबादच्या कलाग्राम एमआयडीसी चिखलठाणा या िठिडकाणी होत आहे. सकाळी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी मतमोजणीसंदर्भात मार्गदर्शन केले. या वेळी सहायक निवडणूक अधिकारी सुनिल चव्हाण (जिल्हाधिकारी, औरंगाबाद), बीडचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार, जालन्याचे जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेसी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, परभणीचे डीएम मुगळीकर, हिंगोलीचे रुचेश जयवंशी, उस्मानाबादचे कौस्तुभ दिवेगावकर हे मतमोजणी स्थळी असून आज रात्री उशिरापर्यंत निकाल लागणार आहे.

Most Popular

error: Content is protected !!