Sunday, August 1, 2021
No menu items!
Homeराजकारणसुप्रिया सुळेंना राज्याच्या नाही, केंद्राच्या राजकारणात रस -पवार

सुप्रिया सुळेंना राज्याच्या नाही, केंद्राच्या राजकारणात रस -पवार


पुणे (रिपोर्टर)- भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी शरद पवार यांच्या समोरच मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी, असं विधान केलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळात सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच चर्चा सुरू झाली होती. परंतु त्यानंतर शेलार यांनी ते वक्तव्य राजकीय नसून पुस्तकातील संदर्भाशी निगडीत असल्याचं म्हटलं होतं. परंतु आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेबाबत मोठं विधान केलं आहे. सुप्रिया सुळे यांना राज्यातील राजकारणास रस नसून त्यांना केंद्रातील राजकारणात रस असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या नावाची मुख्यमत्रीपदाबाबतची चर्चा फेटाळून लावली. सुप्रिया सुळे यांना राज्यातील राजकारणात रस नसून त्यांना राष्ट्रीय राजकारणात रस आहे. सुप्रिया सुळे यांना देशपातळीवर अनेक पुरस्कार प्राप्त झालं आहेत. त्यांना देशपातळीवरच काम करण्याची आवड आहे. प्रत्येकाची एक आवड असते. त्यांची आवड देशपातळीवरील कामात आहे, असं शरद पवार म्हणाले होते. एका मुलाखतीमध्ये या विषयावर भाष्य केलं. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सर्वांचा संच मोठा आहे. या सर्वांतून मान्य असतील अशा अनेक लोकांची नावं घेता येतील. अजित पवार आहेत, जयंत पाटील, धनंजय मुंडे अशी अनेक नावं देता येतील जी नेतृत्व करण्यास सक्षम आहेत, असंही ते नेतृत्वाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

Most Popular

error: Content is protected !!