Sunday, August 1, 2021
No menu items!
Homeबीडकार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करायचा असेल तर तुम्ही तुमच्या रस्त्याने जायला मोकळे -ऍड....

कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करायचा असेल तर तुम्ही तुमच्या रस्त्याने जायला मोकळे -ऍड. डी.बी.बागल


बीड दि . : आज काही स्वयंघोषित नेत्यांनी पत्रक काढून भैय्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या बातमीनंतर आम्ही आमदार संदीप भैया क्षीरसागर यांची भेट घेतली आणि या व्रताच्या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा केली. मात्र यावेळी, आमदार संदीप भैय्या क्षीरसागर म्हणाले की, आज घडीला अथवा एखादे काम करत असताना जर कोणी मला विचारात घेत नसेल व आपल्या मनाचे निर्णय घेत असतील तर अशा व्यक्तीं बद्दल काय बोलावे ? एखादी अडचण असेल अथवा मत असेल तर त्यांनी थेट माझ्याशी चर्चा करणे गरजेचे होते. मात्र असे काहीही झालेले नाही. असा प्रकार घडत असेल तर तो चुकीचा आहे असे ऍड. डी. बी. बागल यांनी एका पत्रकाद्वारे कळवले आहे.
केवळ पत्रकबाजी करून कोणीही नेता होत नसतो केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी एखाद्या व्यक्तीला लक्ष करायचे यापुढे असे सहन केले जाणार नाहीत. जर आमदार संदीप भैयाच्या एखाद्या कार्यकर्त्यांनी चुकीचे काम केले तर त्याचे आम्ही मुळीच समर्थन करत नाहीत मात्र आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांचे नाव वापरून जर कोणी स्वतःचा स्वार्थ साधून बुद्धिभेत करण्याचा घेण्याचा प्रयत्न करत असेल तर ते यापुढे सहन केले जाणार नाही. आशानी आता तरी सावध व्हावे अन्यथा त्यांचा त्यांना रस्ता मोकळा असेल असे पत्रकाद्वारे ऍड. डी. बी. बागल.यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!