Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रभाजपाच्या गडाला खिंडार; पुणे-नागपुरमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा

भाजपाच्या गडाला खिंडार; पुणे-नागपुरमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा


पुणे (रिपोर्टर)- विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत अनपेक्षितपणे भाजपाला मोठा ङ्गटका बसला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारनं विजय मिळवला आहे. पुणे मतदारसंघात तब्बल २० वर्षांनंतर भाजपाला पराभवाचं तोंड पाहवं लागलं आहे. नेहमी भाजपाला साथ देणार्‍या पुणेकर मतदारांनी यंदा राष्ट्रवादीच्या पारड्यात मते टाकून भाजपाच्या गडाला खिंडार पाडले आहे.
पुणे पदवीधर मतदार संघात एक लाख २२ हजार १४५ अशी सर्वाधिक मते घेत महाविकास आघाडीचे अरुण लाड विजयी झाले आहेत. भाजपाच्या संग्राम देशमुख यांना ७३ हजार ३२१ मते पडली आहेत. विजयासाठी एक लाख १५ हजार मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. हा कोटा लाड पूर्ण केल्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे. थोड्यावेळात अधिकृत त्यांच्या विजयाची घोषणा केली जाईल. लाड हे सकाळी ९ वाजता शरद पवार यांच्या भेटीला मोदीबागेत जाणार आहेत.विरोधी पक्षनेते देवेंद्र ङ्गडणवीस यांचा बालेकिल्ला समजला जाणारा नागपूर पदवीधर मतदारसंघातही भाजपाला धक्का बसला आहे. पहिल्या पाचही ङ्गेरीमध्ये भाजपाची पिछेहाट आहे. महाविकास आघाडीनं भाजपाच्या गडाला सुरुंग लावत जोरदार मुसंडी मारली आहे. नागपूर मतदार संघात अभिजित वंजारी यांचा विजय झाला आहे. वंजारी यांनी पहिल्या ङ्गेरीपासूनच आघाडी घेतली होती. भाजपाचे संदीप जोशी हे दुसर्‍या क्रमांकावर राहिले. अमरावती शिक्षक मतदारसंघात मात्र अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांना पराभवाला सामोरे जावे लागले असून या ठिकाणी अपक्ष उमेदवार नाईक यांनी बाजी मारली आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!