Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeमहाराष्ट्रविधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाची धूळधान

विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाची धूळधान


मराठवाड्यात पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, विदर्भात देवेंद्र फडणवीस, पुण्यात चंद्रकांत पाटलांना जबरदस्त धक्का
बीड (रिपोर्टर)- विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मी मी म्हणणार्‍या भारतीय जनता पार्टीतील मातब्बर नेत्यांना जबरदस्त धक्का बसला असून राज्याच्या राजकारणात प्रचंड दबदबा असणारे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरात भाजपाच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला. तगर इकडे पुण्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनाही धक्का बसला. त्याठिकाणीही महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला. मराठवाड्यात औरंगाबाद पदविधर मतदारसंघाच्या निवडणुकीत खा. रावसाहेब दानवेंसह भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना जबरदस्त चपराक बसली असून या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सतीश चव्हाण ५० हजारांपेक्षा जास्त मताधिक्य घेऊन विजयी झाल्याने दानवे -मुंडेंनाही हा धक्का मोठा मानावा लागत आहे.

राज्यात कँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या तीन पक्षांची सत्ता आल्यानंतर ही पहिली मोठी निवडणूक झाली. विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्तेची जागा भाजपाला राकता आली. मात्र अन्य चार जागांवर मी मी म्हणणार्‍या भाजपाच्या बलाढ्य नेत्यांच्या भूमित भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरात गेल्या ५० वर्षांपासून विधान परिषदेची जागा ही भाजपाकडे असायची. या मतदारसंघाचे नेतृत्व कधीकाळी फडणवीसांच्या वडिलांनी केले आहे, ही जागा भाजपाच्याच ताब्यात राहावी यासाठी फडणवीसांसह नितीन गडकरींनी मोठी ताकद लावली होती. मात्र या ठिकाणीही महाविकास आघाडीचा उमेदवार अभिजीत वंजारी हे विजयी झाले आहेत. इकडे पुण्यातही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी मोठी ताकत लावून पुण्याच्या जागेवर भाजपाच्या उमेदवाराचा विजय व्हावा यासाठी मोठे प्रयत्न केले होते परंतु या ठिकाणीही भाजपाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये चंद्रकांत पाटील यांचे जबरदस्त वजन असून ही जागा आपल्याच ताब्यात येणार असे पाटील ठासून सांगायचे.

मात्र इथेही मतदारांनी चंद्रकांत पाटलांना आणि भाजपाला त्यांची जागा दाखवून दिली. इकडे मराठवाड्यात औरंगाबाद पदवीधर शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक लागल्यानंतर भाजपाने मोठी ताकद लावली होती.

खा. रावसाहेब दानवे, भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह मातब्बर नेते महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी ताकद लावून होते मात्र या ठिकाणी मुंडे, दानवेंसह फडणवीसांना पदवीधर मतदारांनी जबरदस्त चपराक देत महाविकास आघाडीचे उमेदवार तथा राष्ट्रवादीचे खंदे समर्थक सतीश चव्हाण यांना ५० हजारांपेक्षा जास्त मताने विजयी केले. तर धुळे, नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले आणि नुकतेच भाजपात डेरेदाखल झालेले अमरीश पटेल हे निवडून आले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!