Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeराजकारणमहाआघाडीची भाजपाला पटकी

महाआघाडीची भाजपाला पटकी

महाआघाडीची भाजपाला पटकी
मजीद शेख
बीड- राष्ट्रवादी, शिवसेना,कॉंग्रेस हे तिन्ही पक्ष सत्तेत एकत्रीत आल्याने या तिघांची ताकद वाढली. या तिन्ही पक्षासमोर टिकणं हे भाजपासाठी खुप मोठं आव्हान आहे. या तिन्ही पक्षाच्या ताकदीचा अंदाज भाजपाला पदवीधर,शिक्षक निवडणुकीत आला. पुर्वी भाजपा या तिन्ही पक्षाच्या ताकदीला तितकी किंमत देत नव्हता. जेव्हा पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निकाल हाती आले, तेव्हा राज्यातील भाजपाच्या नेत्यांचे डोळेच उघडले. जे भाजपाचे मजबुत किल्ले होते, त्या किल्लयाला महाआघाडीने हादरा दिला. पाच पैकी चार जागा जिंकून भाजपाला चांगलीच पटकी दिली.

राज्यातील महाआघाडी सरकारला नुकतचं वर्ष झालं. वर्षपुर्तीतील पहिलीच निवडणुक पदवीधर, शिक्षक मतदारांची झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी,शिवसेना, कॉंग्रेस पक्षाने एकत्रीत येवून निवडणुक लढवल्या. निवडणुकीत आघाडीचा निभाव लागणार नाही, असा खोटा बोभाटा भाजपावाल्यांनी केला. मात्र त्यांचा हा खोटा बोभाटा त्यांच्याच अंगलट आला. महाआघाडीने दणदणीत यश मिळवल्याने भाजपाचे पुरते पानीपत झाले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठवाड्यातील मात्री मंत्री पंकजा मुंडे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आप-आपल्या विभागात प्रचाराचा धुमधडाका लावला होता. आरोप-प्रत्यारोप करुन ही निवडणुक चांगलीच चर्चेत आली होती. महाआघाडीकडून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष पाटील, मंत्री धनंजय मुंडे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरातसह आदी मंडळी प्रचारात उतरली होती. या निवडणुकीत नेमकं काय होतयं याकडे राज्याचं लक्ष लागून होतं. जेव्हा निकाल हाती आले, तेव्हा भाजपाचा पुरता पाचोळा झाला होता, ज्या मतदार संघात पुर्वी भाजपाचे वर्चस्व होते, त्या ठिकाणी भाजपाला आपलं वर्चस्व राखता आले नाही. नागपुर हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. मात्र या किल्लयाला महाआघाडीने सुरुंग लावलं आणि त्या ठिकाणी महाआघाडीचा उमेदवार निवडून आला. पुण्यात ही भाजपाने मोठी ताकद लावली होती. मात्र त्यांची ताकद तिथं कामी आली नाही. चंद्रकात पाटील यांनी पुण्याची जागा मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, पाटलांचा त्या ठिकाणी निभाव लागू शकला नाही. एक्झीट पोल पुर्णंता भाजपाच्या बाजुने दाखवण्यात आला होता. तो कसा दाखवला होता याचं आज आश्‍चर्य वाटू लागलं. महाअघाडीने पदवीधर, शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत चांगले यश मिळवल्याने महाआघाडीचा आत्मविश्‍वास अधिकच वाढला आहे. पवारांनी महाआघाडी पंचवीस वर्ष टिकेल असं सांगितलं. जर असं झालं तर नक्कीच भाजपाला पळता भुई थोडी होईल.

Most Popular

error: Content is protected !!