Friday, October 22, 2021
No menu items!
Homeमहाराष्ट्रमराठवाडानिवडणूक निकालानंतर पोकळेंची हवा पोकळ ढवळे-मुंडेंची जिल्ह्यात चर्चा

निवडणूक निकालानंतर पोकळेंची हवा पोकळ ढवळे-मुंडेंची जिल्ह्यात चर्चा


बीड (रिपोर्टर)- भाजपातल्या बंडखोरीने अवघ्या महाराष्ट्रात चर्चेत राहिलेले औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार रमेश पोकळे यांची राज्यभरात नुसती चर्चाच झाली. मात्र प्रत्यक्षात मतदानात पोकळे थेट पाचव्या क्रमांकावर जावून पोहचले. निकालानंतर सिद्धेश्‍वर मुंडे आणि सचिन ढवळे यांनी पोकळेंपेक्षा जास्त मतदान घेतल्याने जिल्ह्यात या दोघांचीही चर्चा होत असून पोकळेंची हवा पोकळ ठरली असं म्हणत मराठवाडा पदवीधर संघाच्या निकालानंतर उमेदवारांना पडलेल्या मतांवरून ठिकठिकाणी चर्चा होताना दिसून येत आहे.

dhawale


औरंगाबाद पदवीधर शिक्षक मतदारसंघासाठी तब्बल ३५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यामध्ये बीड जिल्ह्यातून अनेक उमेदवार रिंगणात होते. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी उमेदवारी दाखल केल्यानंतर पोकळेंवर भाजपातून बंडखोरीचा शिक्का लागला. बंडखोर असलेले रमेश पोकळे हे माजी मंत्री पंकजा मुंडेंचे खंदे समर्थक असल्याने आणि त्यांनी उमेदवारी मागे न घेतल्याने राज्यभरात पोकळेंची चर्चा होत होती. पंकजा मुंडे अंधारातून पोकळेंच्या पाठिशी आहेत, असेही बोलले जात होते. त्यामुळे मराठवाडा पदवीधर मतदारसंघात चुरस निर्माण होईल असे वातावरण निर्माण करण्यात आले होते.

sidheshwar

राज्यभरात पोकळेंची हवा झाली होती. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातही पोकळेंनी चांगली हवा केली होती मात्र जेव्हा प्रत्यक्षात मतदान झाले आणि मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा सुरुवातीपासून महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण हे आघाडीवर राहत सरशेवटी ५० हजारापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आले. अशा स्थितीतही रमेश पोकळेंना किती मते पडली यावर बीड जिल्ह्यातील जनतेचे लक्ष होते. जेव्हा संपुर्ण निकाल हाती आला तेव्हा पोकळेंची मतदारसंघातील जिल्ह्यात नुसती हवाच असल्याचे सिद्ध झाले.

या निवडणुकीमध्ये पोकळेंपेक्षा सिद्धेश्‍वर मुंडेंना जास्त मते पडली. तर बच्चु कडू यांचे उमेदवर सचिन ढवळे यांनी तर तब्बल ११ हजार ७०२ मते घेतले. सिद्धेश्‍वर मुंडेंना ८ हजार ५३ मते पडली तर भाजपाचे बंडखोर असलेले आणि राज्यभरात चर्चेेत राहिलेले रमेश शिवदास पोकळे यांची हवा मात्र पोकळ राहिली आणि त्यांना केवळ ६ हजार ७१२ मतदान पडले.

Most Popular

error: Content is protected !!