Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeआरोग्य & फिटनेसबीड जिल्ह्यात कोरोनाचा टक्का घसरला

बीड जिल्ह्यात कोरोनाचा टक्का घसरला

८२१ संशयितांमध्ये आढळले
केवळ २८ पॉझिटिव्ह
बीड (रिपोर्टर)- गेल्या आठ दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या रुग्णात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. आज आरोग्य विभागाला ८२१ संशयितांचे अहवाल प्राप्त झाले आहे. त्यामध्ये केवळ २८ जण बाधीत आढळून आले आहेत. गेल्या एक महिन्यापुर्वी हाच आकडा शंभर ते दीडशेच्या पुढे होता.

आता कोरोना आटोक्यात आल्याचे आकडेवारीवरून दिसून येत असले तरी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. आतापर्यंत १० हजार ३६७ शिक्षकांच्या तपासण्यात करण्यात आल्या असून त्यापैकी २६५ अहवाल आरोग्य विभागाला येणे बाकी असून १०६ जण बाधीत आढळून आले आहेत.


आज ८२१ संशयितांचे अहवाल आले असून त्यामध्ये केवळ २८ बाधीत तर ७९३ जण निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई ७, बीड ८, धारूर-गेवराई-वडवणी प्रत्येकी एक, केज-माजलगाव प्रत्येकी ४ तर परळीत २ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!