Sunday, August 1, 2021
No menu items!
Homeबीडमोदी सरकारचा तडका, पेट्रोल-डिझेलचा भडका

मोदी सरकारचा तडका, पेट्रोल-डिझेलचा भडका

मोदी सरकारचा तडका, पेट्रोल-डिझेलचा भडका
बीडमध्ये डिझेल ८० च्या घरात, राज्यात सर्वात महाग पेट्रोल परभणीत
महाराष्ट्रातल्या ७ जिल्ह्यात डिझेल ८० च्या वर तर १५ जिल्ह्यात पेट्रोल ९१ रुपयांपर्यंत
बीड (रिपोर्टर)- देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढत चालले असून कोरोना काळात पेट्रोल-डिझेलच्या दरात विक्रमी वाढ झाली असून काल झालेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीने महाराष्ट्रातल्या सात जिल्ह्यांमध्ये डिझेलचे दर ८० रुपयांच्या वर गेले आहेत. तर पेट्रोलचे दर ९१ रुपये प्रति लिटरच्या पुढे गेल्या आहेत. बीडमध्ये डिझेलचे भाव ७९ रुपये ८१ पैशांवर जावून पोहचले असून पेट्रोल ९०.९० इथपर्यंत गेले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक पेट्रोलचा दर हा परभणीत असून त्याठिकाणी ९१ रुपये ९५ पैसे प्रतिलिटर दराने पेट्रोल घ्यावे लागत आहे.

मागील काही दिवसात राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढताना दिसून आले. २५ नोव्हेंबर रोजी ७७.९ पैसे प्रतिलिटर असणारे डिझेलचे दर आज ७९.८१ पर्यंत जावून पोहचले असून मागील नऊ दिवसांमध्ये १ रुपया ९१ पैशाने दरवाढ झाली आहे. मुंबईतही मागील काही दिवसांपासून डिझेलच्या किमतीत होणारी दरवाढ ही आता ८० रुपयांपर्यंत जावून पोहचली आहे.

दुसरीकडे पेट्रोलच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून आज पेट्रोलचा भाव राज्यात ९० वर जावून पोहचला आहे. काल सरकारी तेल कंपन्यांंनी डिझेल-पेट्रोल किमती वाढवल्याचे जाहीर केले. त्यात डिझेल १८ ते २० पैसे आणि पेट्रोल १५ ते १७ पैशाने वाढल्याने राज्यातील सात जिल्ह्यात डिझेल ८० रुपयांच्या वर गेले आहे तर १९ जिल्ह्यांमध्ये पेट्रोलने ९० चा टप्पा पार केला आहे.


बीड जिल्ह्यात आज मितीला ७९.८१ रुपये प्रति दराने डिझेल घ्यावे लागते तर पेट्रोल ९०.९० रुपयाने घ्यावे लागत आहे. सातत्याने वाढत चाललेल्या पेट्रोल-डिझेलच्या किमतीमुळे देशातले भाजप सरकारच्या अच्छे दिनवर लोकांचा संताप व्यक्त होताना दिसून येत आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!