Sunday, August 1, 2021
No menu items!
Homeक्राईमहद्दपार इसमाला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

हद्दपार इसमाला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या


बीड (रिपोर्टर):- बीड जिल्हयातील हददपार इसमांची माहिती घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत यांच्या यांचे अधिपत्याखालील वेगवेगळे पथके तयार केलेले असुन सदर पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी दिनांक ०५.१२.२०२० रोजी पोलीस ठाणे शिरुर हददीत जात असताना नवगण राजुरी येथे गेल्यावर गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हददपार इसम नामे संतोष सर्जेराव गावडे हा नवगण राजुरी येथील नवगण नर्सरी मध्ये बसलेला आहे.

त्यावरुन पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सदर ठिकाणी जाऊन वरील इसमास ताब्यात घेतले असता.त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव संतोष सर्जेराव गावडे वय ३९ वर्ष रा.राजुरी नवगण ता.जि.बीड असे सागितले त्यावरुन अभिलेखावरुन तपासणी करुन खात्री केली असता संतोष सर्जेराव गावडे यास मा उपविभागीय दंडाधिकारी बीड यांचे हददपार आदेश क्र २०१९/एमएजी/हददपार कावी/२३६९/बीड दिनांक २१.०९.२०२० अन्वये मपोका १९५१ चे कलम ५७ प्रमाणे बीड जिल्हयातुन (६) महिण्यासाठी हददपारीचा आदेश केलेला असताना वरील इसम नवगण राजुरी ता.जि.बीड येथे अनाधिकृत पणे मिळुण आल्याने त्याचे विरुध्द बीड ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुरन ३८७/२०२० मपोका कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन पुढिल तपास बीड ग्रामीणचे पोलीस करत आहेत सदरची कामगीरी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

Most Popular

error: Content is protected !!