Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeबीडआणखी किती जणांचे बळी घेणार? आ. सुरेश धसांचा वन मंत्र्यांना सवाल

आणखी किती जणांचे बळी घेणार? आ. सुरेश धसांचा वन मंत्र्यांना सवाल


आष्टी (रिपोर्टर)-सध्या बिबट्याची दहशत आष्टी तालुक्यातून करमाळा तालुक्यातही झाली आहे.आता राजकारण बाजूला ठेऊन राज्याचे वनमञ्यांनी आता बाहेर पडून हा नरभक्षक बिबट्या तात्काळ जेरबंद करण्यासाठी सुचना देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आ.सुरेश धस यांनी केले.


राज्यात विधान परिषद निवडणुकीत दंग झालेल्या राज्याचे वनमंञी संजय राठोड यांनी आता आष्टी तालुक्यातील नरभक्ष असलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी दखल घेण्याची गरज आहे.नरभक्ष बिबट्या ने आष्टी तालुक्यातील तीन व करमाळा तालुक्यात एकबळी घेतला आहे.अजून किती बळी घेण्याची वाट बघणार आहेत.आता तरी राज्याचे वनमंञ्यांनी जागे होऊन वन अधिका-यांना तात्काळ सुचना देऊन बिबट्या कसा जेरबंद करता येईल ते पाहवे किंवा त्याला ठार मारण्याची परवानगी तरी तात्काळ द्यावी अशी मागणी आ.सुरेश धस यांनी केली आहे.

Most Popular

error: Content is protected !!