Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeबीड९० ग्रा.पं.च्या सरपंचपदासाठी ८ तारखेला आरक्षण सोडत

९० ग्रा.पं.च्या सरपंचपदासाठी ८ तारखेला आरक्षण सोडत


परळी (रिपोर्टर)- परळी तालुक्यातील ९० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून सरपंच पदाचे आरक्षण सोडत मंगळवार दि .८ डिसेंबर २०२० रोजी परळी तहसील कार्यालयात दुपारी ३ वा. होणार असल्याची माहिती नायब तहसीलदार बी. एल. रुपनर यांनी दिली आहे.


परळी तालुक्यात ९० ग्रामपंचायतींच्या सन २०२० ते २०२५ या पाच वर्षासाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडत करण्यात येणार आहे. जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने मंगळवार दि. ८ रोजी दुपारी ३ वाजता तहसील कार्यालयाच्या सभागृहात हा सोडतीचा कार्यक्रम उपविभागीय अधिकारी परळी श्रीमती.नम्रता चाटे, तहसीलदार डॉ. विपीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीचे गांभीर्य ओळखून तोंडावर मास्क, सॅनिटायझर अन् ङ्गिजिकल डिस्टन्स ठेऊन नागरिकांनी उपस्थितीत राहण्याचे आवाहन तहसीलदार डॉ. विपीन पाटील यांनी केले.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!