Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeमहाराष्ट्ररवी पटवर्धन यांचं निधन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला शोक

रवी पटवर्धन यांचं निधन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला शोक

मुंबई (रिपोर्टर)- मराठी रंगभूमीसह चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचं आज निधन झालं. रवी पटवर्धन यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीसह राजकीय क्षेत्रातही हळहळ व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शोक व्यक्त केला आहे.


रवी पटवर्धन यांच्या निधनाने चरित्र भूमिकेला आपल्या अभिनयाने भारदस्तपणा मिळवून देणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्याला आपण मुकलो आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
’वयावर मात करुन जिद्दीने रंगभूमीची सेवा करणारा सच्चा कलाकार आज आपल्यातून गेला. दुरदर्शनवरील वस्ताद पाटील असो किंवा महाभारतातील धृतराष्ट्र असो, रवी पटवर्धन यांनी प्रत्येक लहान मोठ्या भूमिकांमध्ये अक्षरशः प्राण ओतला. असा चतुरस्त्र कलाकार आज आपल्यातून गेल्यानं मोठी हानी झाली,’ असं उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. ’वयाची ८० वर्ष पार करुनही त्यांनी अविरत काम केले.

रवी पटवर्धन हे आजच्या कलाकारांसमोर आदर्श आहेत. एकाच साच्याच्या भूमिका न करता त्यांनी वैविध्य ठेवले आणि म्हणूनच त्यांची ओळख टिकून राहिली. सिने नाट्य सृष्टीतील एक मराठमोळे भारदस्त आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपल्यातून गेले,’ अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. पटवर्धन यांनी दीडशेहून अधिक नाटकांमध्ये काम केले आहे. तसेच त्यांनी २०० हून अधिक चित्रपट केले आहेत.

विशेष म्हणजे सन १९७४ मध्ये रत्नाकर मतकरी यांच्यासोबत आरण्यक या नाटकात पहिल्यांदा काम केले. त्यानंतर वयाच्या ८२ व्या वर्षीही त्यांनी या नाटकात धृतराष्ट्राचीच भूमिका साकारली. ’अग्गबाई सासूबाई’ ही त्यांची शेवटची मालिका ठरली.

Most Popular

error: Content is protected !!