बीड (रिपोर्टर) बारावीच्या परिक्षेनंतर आजपासून दहावीच्या परिक्षेला सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात एकूण 156 मुख्य परिक्षा केंद्र असून 496 उपकेंद्र आहेत. 41 हजार 676 विद्यार्थी परिक्षा देत आहेत. कॉप्यांना आळा घालण्यासाठी सहा भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली.
यावर्षी स्थानिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांची परिक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. बारावीच्या परिक्षेनंतर आजपासून दहावीच्या परिक्षेला सुरूवात झाली. बीड जिल्ह्यात एकूण 156 मुख्य तर 496 उपकेंद्र आहेत. या केंद्रावर 41 हजार 676 विद्यार्थी परिक्षा देत आहेत. परिक्षेमध्ये कसलाही गैरप्रकार होवू नये, कॉप्याला आळा बसावा यासाठी शिक्षण विभागाच्यावतीने सहा भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.