Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeबीडमहिलेचा खून की आत्महत्या?,

महिलेचा खून की आत्महत्या?,


माजलगाव (रिपोर्टर) तीन वर्षापूर्वी विवाह झालेल्या एका 23 वर्षीय विवाहित महिलेचा पुरूषोत्तमपुरी शिवारात एका विहिरीत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या महिलेचा खून करण्यात आला की तिने आत्महत्या केली? याबाबत चर्चा होत असून या प्रकरणाचा तपास माजलगाव पोलिस करत आहेत.


माजलगाव शहरापासुन तीस किलो मिटर अंतरावर असलेल्या पुरूषोत्तमपुरी येथील महादेव लोखंडे यांचा विवाह सोनाली रा.लेंडेश्‍वर जि. परभणी यांचा विवाह मागील तिन वर्षांपूर्वी झाला होता. परंतु सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या त्रासामुळे सोनाली या नांदत नव्हत्या. अशामध्येच मागील काही दिवसांपूर्वी त्यांचा वाद मिटवित सोनाली या पुरूषोत्तमपुरी येथे विस दिवसांपूर्वी नांदायला आल्या होत्या परंतु दि.14 मार्च दुपारपासुन गायब होत्या. यावर कुटूंबीयांनी त्यांची शोधा – शोध केली परंतु त्या सापडत नव्हत्या. मंगळवारी सकाळी त्यांचा मृतदेह शेतातील विहीरीत आढळुन आला असुन या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे. त्या विवाहित महिलेचा खून करण्यात आला की तिने आत्महत्या केली? याबाबत चर्चा होत आहे. घटनेची माहिती माजलगाव ग्रामीण पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. याप्रकरणाचा अधिक तपास पीएसआय सुनिल बोडके हे करत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!