माजलगावात गुन्हा दाखल
माजलगाव (रिपोर्टर) आयशर वाहन चालकाला अडवून त्याला कोयता अन चाकुचा धाक दाखवत मारहाण करून त्याच्याजवळील नगदी 2 लाख 50 हजार रूपये आणि मोबाईल असा पावणे तीन लाखाचा मुद्देमाल लुटल्याची घटना रात्री केसापूरी गावाजवळ घडली असून याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिसात अज्ञात तिघाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
शेख अख्तर शेख पाशा (वय 32, चालक, रा.किल्लावेस, कमवाडा बीड) हे माजलगाव ते परतुर रोडवर केसापुरी गावाजवळ आयशर क्र.(एम.एच.43 वाय 2584) घेवून जात होते. यावेळी केसापुरी गावाजवळ त्यांच्या आयशरला विना क्रमांकाच्या पल्सर दुचाकीवरून अडवले. तिघाजणांनी गाडी आडवी लावून थांबवले. यावेळी हातातील रॉड, चाकु व कोयत्याने शेख अख्तर आणि त्यांच्या साथीदाराला मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यांना गंभीर मारहाण करत त्यांच्याकडील नगदी 2 लाख 50 हजार व त्यांच्या खिशातील दोन रेडमी कंपनीचे मोबाईल असा एकूण 2 लाख 60 हजाराचा मुद्देमाल लुटून पोबारा केला. जखमी चालक शेख अख्तर यांनी घटनेची माहिती माजलगाव ग्रामीण पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. जखमींवर उपचार सुरू असून याप्रकरणी शेख अख्तर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात तिघांजणा विरोधात माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गु.र.न.47/2022 कलम 394, 34 भादवि गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक निरीक्षक झोनवाल हे करत आहेत.