बीड (रिपोर्टर)ः- मराठा भूषण आमदार तानाजी सावंत साहेब यांचा वाढदिवस निमित्य मात्र वाढदिवसाचा कसलाही डामडौल न करता आमदार तानाजी सावंत यांच्या आदेशानुसार बीडमध्ये पसायदान या अनाथालयात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला गेल्या दोन वर्षाच्या कोरोना काळात कसलेही सणवार उत्सव हे साजरे करता आले नव्हते मात्र यंदा करूनच सावट थोडे फार कमी झाले आहे त्यामुळेच अ भा छावा मराठा युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक अण्णा रोमन यांनी ढेकणमोहा येथील अनाथालय पसायदान सेवा प्रकल्प येथे भेट देऊन तेथील अनाथ मुलांसोबत रंगपंचमी खेळत गाण्यावर ठेकाही धरला यावेळी अनेक पदाधिकारी कार्यकर्ते समाज सेवक उपस्थित होते अनाथालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक गर्जा निमित्त अशोक अण्णा रोमण यांनी दोन लाख रुपयाचा धनादेश पसायदान चे संचालक गोवर्धन बडे यांच्याकडे सुपूर्द केला,यावेळीं सर्व छावा पदाधिकारी व मित्रपरिवार उपस्थित होते.
मराठा भूषण आमदार तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथालयाला दोन लाखांची मदत
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.