बीड (रिपोर्टर)- अल्प भूधारक शेतकर्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याच्या दृष्टीकोनातून या शेतकर्यांना दुधाळ गाई, म्हशींसह शेळ्यांचे वाटप केले जातात. गेल्या काही महिन्यांपूर्वी पशूसंवर्धन विभागाने अर्ज मागवले होते. या अर्जामधून काही लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांना दहा शेळ्या आणि बोकड मिळणार आहे.
दरवर्षी पशूसंवर्धन विभागाकडून शेळ्यांसह दुधाळ जनावरांचे वाटप केले जाते. यावर्षी काही महिन्यांपूर्वी अर्ज मागवण्यात आले होते. या अर्जांची छाननी करत काहींना शेळ्या आणि एक बोकड मिळणार आहे. यामध्ये बीड तालुक्यातील कुंभारी, हिंगणी, राजूरी, शिवणी, आहेर चिंचोली, नेकनूर, लिंबागणेश, पाटेगाव, म्हाळसजवळा, येळंबघाट, साखरे बोरगाव, कुक्कडगाव, ढेकणमोहा, जुजगव्हाण, लिंबा, घाटजवळा, बेलापुर, उमरद जहॉंगीर, वासनवाडी येथील एससी समाजाच्या लाभार्थ्यांना शेळ्यांचा लाभ मिळणार आहे.