Wednesday, May 18, 2022
No menu items!
HomeUncategorizedजावयाची गदर्भ सवारी जल्लोषात करण्यासाठी विडेकर सज्ज

जावयाची गदर्भ सवारी जल्लोषात करण्यासाठी विडेकर सज्ज

९५ वर्षांपासूनची आहे परंपरा


विडा येथे मागील ९५ वर्षांपासून धुळवडीच्या दिवशी जावयाची चक्क गाढवावरून मिरवणूक काढण्याची परंपरा आहे.परंतू कोरोनामुळे २०२०-२०२१ या दोन वर्षात परंपरेला खंड पडला होता.दरम्यान यावर्षी खंडीत झालेली परंपरा पूर्ववत करून मोठ्या जल्लोषात जावयाची गाढवावर बसवून मिरवणूक काढण्यासाठी विडेकर सज्ज आसल्याची माहीती विड्याचे युवा सरपंच सुरज पटाईत यांनी दिली आहे.


केज तालुक्यातील विडा या गावाने गेल्या ९५ वर्षापासून जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची परंपरा आहे.परंतु कोरोना संक्रमणामुळे गेल्या दोन वर्षापासून या परंपरेला खंड पडला होता.यावर्षी पुन्हा ही परंपरा पूर्ववत होणार आहे.त्यामुळे जावयांनी चांगलाच धसका घेतला आहे.हजारावर उंबरे व सात हजार लोकसंख्येचे विडा हे निजाम राजवटीतील जागीरदारीचे गाव म्हणून ओळखले जाई.तत्कालीन जहागीरदार ठाकूर आनंदराव देशमुख यांचे चिंचोली (जि.लातूर) येथील मेहुणे धुलिवंदनाच्या दिवशी विड्यात आले होते.त्यांचा खास पाहुणचार केला गेला.मात्र तेव्हा गावातील कर्त्या मंडळींनी त्यांची थट्टामस्करी करून चक्क गाढवावर बसून सवारी काढली. तेव्हापासून सुरू झालेली ही परंपरा अजूनही कायम आहे. परंतू कोरोना संक्रमणामुळे २०२०-२०२१ या दोन वर्षात परंपरेला खंड पडला होता.यावर्षी मात्र ही परंपरा पुन्हा पूर्ववत सुरू होणार आसून दिनांक १८ रोजी रंगाची उधळण करीत हलगीच्या तालावर जावयाची जल्लोषात गदर्भ मिरवणूक निघणार आसून त्यासाठी विडेकर पूर्णपणे सज्ज आसल्याची माहीती युवा सरपंच सुरज पटाईत यांनी दिली आहे.

Most Popular

error: Content is protected !!