Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडस्कुटीला अज्ञात वाहनाची धडक; शहरातील दोन तरुण ठार

स्कुटीला अज्ञात वाहनाची धडक; शहरातील दोन तरुण ठार


घाटसावळी जवळ घडली रात्री घटना; बशीरगंज भागात हळहळ, मयत तरुण परळीहून बीडकडे येत होते
बीड (रिपोर्टर) मित्राला सोडून परळीहून बीडकडे मोटारसायकलवर येणार्‍या तरुणास अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने या अपघातात दोन्ही तरुण ठार झाल्याची दुर्दैवी घटना रात्री साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान घाटसावळीजवळ घडली. दोन्ही मयत तरुण बीड शहरातील बशीरगंज भागातील होते. या घटनेने बशीरगंज भागात हळहळ व्यक्त केली जात आहे.


बीड शहरामधील बशीरगंज भागात राहणारे शेख शाहीद सलीम बागवान व हाफिज माहरुफ शफीक फारुकी हे दोघे काल आपल्या मित्राला सोडण्यासाठी परळीला गेले होते. त्यास त्याठिकाणी सोडून हे दोघे परळीहून बीडकडे आपली मोटारसायकल (क्र. एम.एच. २३ बी.डी. २५००) यावर येत होते. घाटसावळीजवळ रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने या अपघातात शेख शाहीद सलीम बागवान (वय १९) व हाफिज माहरुफ शफीक फारुकी हे दोघे गंभीररित्या जखमी होऊन ठार झाले. या घटनेने बशीरगंज भागामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. आज दुपारी त्यांच्यावर दफनविधी करण्यात आला आहे.

Most Popular

error: Content is protected !!