किल्ले धारूर (रिपोर्टर) महाराष्ट्रातील पहिली कुटुंबासह सामुदायिक आत्महत्या करणारे कै.साहेबराव करपे पाटील आणि कै.मालती करपे यांनी 19 मार्च 1986 रोजी कुटुंबासह आत्महत्या करून आपले जीवन संपवले त्यांच्या स्मृतिदिनानिमीत्त शेतकर्यांना पाठींबा देण्यासाठी व शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याकारणाने आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या प्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी गेल्या पाच वर्षापासून अन्नत्याग आंदोलन किल्ले धारुर शहरातील किसानपुत्र आंदोलन समितीच्या वतीने करण्यात येते त्याप्रमाणे याही वर्षी 19 मार्च 2022 रोजी सकाळी 10 ते 4 यावेळेत अन्नत्याग आंदोलन किल्ले धारुर शहरातील हुतात्मा स्मारक येथे शासकीय नियमांचे पालन करत आंदोलन करण्यात आले.
जो पिकवितो घास त्यासाठी एक दिवसाचा करु या उपवास म्हणून आम्ही 19 मार्चला अन्नत्याग उपवास करणार आहोत. शेतकर्यांच्या आत्महत्यांच्या घटना आम्हाला अस्वस्थ करतात म्हणून आम्ही 19 मार्चला अन्नत्याग उपवास करणार आहे. शेतकर्यांच्या आत्महत्यांचे मूळ कारण सिलिंग, आवश्यक वस्तू, अधिग्रहण आदी नरभक्षी कायदे रद्द करण्याबाबत आहेत, याची मला जाणीव आहे म्हणून मी 19 मार्चला अन्नत्याग उपवास करत आहोत. शेतकर्यांच्या प्रश्न सोडविण्याचे अन्य सर्व मार्ग निरुपयोगी ठरले आहेत, त्यांचे स्वातंत्र्य नाकारणारे कायदे रद्द झाले पाहिजेत अशी मागणी करत आहोत.
यावेळी किसानपुत्र विजय शिनगारे, अनिल महाजन, अतुल शिनगारे, संदिपान तोंडे, दिनेश कापसे, ज्ञानेश्वर शिंदे, बंडोबा सावंत, संतोषसिंह दिख्खत, सादेक इनामदार व सुयश किनकर, शुभम औताडे यांनी सहभाग घेतला.