Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeबीडकेजअमृतराजे देशमुख ठरले यंदाच्या विडा येथील गदर्भ सवारीचे मानकरी 95 वर्षांपासून

अमृतराजे देशमुख ठरले यंदाच्या विडा येथील गदर्भ सवारीचे मानकरी 95 वर्षांपासून


जावाई गंधर्भ सवारीचा परंपरा कायम
विडेकरांनी काढली लाडक्या जावयाची गाढवावर बसवून वाजत गाजत मिरवणूक!
केज/मस्साजोग (रिपोर्टर) दरवर्षी धुलिवंदनच्या निमित्ताने जावयाची गाढवावरून मिरवणूक काढली जाते. त्यानंतर जावयाला उभा पोशाख करून परत पाठवतात. धुलिवंदनच्या 2 दिवस अगोदर संपूर्ण गाव जावयाचा शोध घेत असते. जो जावई मिळेल त्याला पकडून गावात आणून गाढवावरून मिरवणूक काढली जाते. जिल्ह्यातील केज तालुक्यामधील विडा या गावी ही अनोखी प्रथा सुरू आहे. परंतु कोरोना महामारीमुळे 2020-2021 या दोन वर्षांपासून या परंपरेला खंड पडला होता. म्हणुन यावर्षी पुन्हा ही परंपरा पुर्ववत सुरू करण्यात आली व यंदाच्या गदर्भ सवारीचा मान विडा येथील श्रीमंतराव देशमुख यांच्या तुळजापूर तालुक्यातील जावई अमृतराजे देशमुख यांना मिळाला आहे.


अशी सुरू झाली ही परंपरा –
95 वर्षांपूर्वी ही परंपरा सुरू झाली. असे सांगितले जाते की, गावातील ठाकूर आनंदराव देशमुख यांच्या जावयाला पहिल्यांदा 95 वर्षांपूर्वी गावकर्‍यांनी गाढवावर बसवून त्यांची गावभर मिरवणूक काढली. हनुमान मंदिराच्या पारावर ही मिरवणूक आणली व त्यानंतर त्या नाराज झालेल्या जावयांचा पारावर मोठा सन्मान केला. त्यांना उभा पोशाख करून सोन्याची अंगठी दिली. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली ते आतापर्यंत सुरूच आहे. या वर्षीचा गंधर्भ सवारीचा मान जावाई अमृतराजे देशमुख या लाडक्या जावयाला मिळाला आहे.तरी हनुमान मंदिर पारावर उभा पोशाख चढवून पाच ग्रॅम ची सोन्याची अंगठी देण्यात आली. ही अनोखी परंपरा अनेक वर्षापासून सुरू आहे. याची मोठी चर्चा राज्यभरात होते.
धुलिवंदनच्या दिवशी डॉल्बी लावुन जावाई अमृतराजे देशमुख यांची गाढवावर बसवून संपूर्ण गावात मिरवणूक काढून त्यांना हनुमान मंदिर पारावर उभा पोशाख चढवून पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी बोटात घालून मान सन्मान करण्यात आला.या निमित्ताने विडा गावातील लोक एकत्र येऊन रंग खेळत. मोठ्या उत्साहात होणार्‍या या अनोख्या उपक्रमाचा आनंद घेण्यासाठी आजूबाजूच्या गावचे नागरिक देखील धुलिवंदनच्या दिवशी गावामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही प्रथा गेल्या 95 वर्षांपासून सुरू आहे.

गदर्भ सवारीत जरी जावयाला वाईट वाटले असेल तर आम्ही ग्रामस्थांच्यावतीने जावयाची माफी मागतो. माफी मागण्याचे कारण 95 वर्षापासून हि परंपरा चालत आलेले हि परंपरा आनंद उत्साह परंपरा या याही वर्षी आनंदात साजरी केली आहे. गेल्या दोन वर्षांत आम्हाला हि परंपरा कोरोना महामारीमुळे साजरी करता आली नाही. म्हणून यावर्षी गावातील सर्व जातीच्या लोकांनी एकत्र येऊन आनंदमयी आणि उत्साहात हि परंपरा साजरी केली.
सुरज पटाईत
सरपंच विडा.

Most Popular

error: Content is protected !!