परळी (रिपोर्टर) परळी परभणी रेल्वे मार्गावरील उखळी बुद्रुक रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे पटरी खाली एका इसमाने आत्महत्या केल्याचा प्रकार आज (दि.19) सकाळी उघडकीस आला आहे.
उखळी बुद्रुक रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे रुळावर सकाळच्या सुमारास अंदाजे 35 वर्षिय एका अनोळखी इसमाचा रेल्वेखाली कटलेला मृतदेह आढळून आला. हा इसम रेल्वेच्या ट्रॅक वर सुरू असलेल्या कामावरील कामगार असावा असा प्राथमिक अंदाज आहे. काल दिवसभर हा इसम या रेल्वे मार्गावर फिरताना नागरिकांनी पाहिलेला होता. दरम्यान या इसमाचा मृतदेह सकाळी आढळल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळावर या इसमाचा मोबाईल आढळला असून त्यातील सिम कार्ड काढून टाकल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळे त्याने स्वतःहून या ठिकाणी आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.