Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeबीडक्रेडिट कार्ड देतो म्हणून नोकरदाराला तीन लाख रुपयांना फसविले

क्रेडिट कार्ड देतो म्हणून नोकरदाराला तीन लाख रुपयांना फसविले


बीड (रिपोर्टर) ‘मी आयसीआयसीआय बँक शाखा मुंबई येथून बोलतोय, तुम्हाला क्रेडिट कार्ड सुविधा सुरू करण्यासाठी कॉल केला असून व्हेरिफिकेशनसाठी ओटीपी सांगा,’ असे म्हणून एका नोकरदाराला 2 लाख 93 हजार 508 रुपयांना गंडवल्याची घटना परळीत घडली असून या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

तुळशीराम मोतीराम गंगणे (वय 51 वर्षे, रा. समता नगर, जलालपूर, जिरेवाडी) यांना 22 फेब्रुवारी रोजी एका मोबाईलवरून फोन आला होता. तो आपल्याला क्रेडिट कार्ड सुविधा सुरू करायची आहे, त्यासाठी मी आयसीआयसीआय बँक शाखा मुंबई येथून बोलतोय,म्हणत गंगणे यांना ओटीपी विचारला. त्यांनी ओटीपी सांगताच त्यांच्या अकाऊन्टवरील 98 हजार 531 रुपये कट झाले. याबाबत त्यांनी समोरच्या व्यक्तीला विचारले असता, ही क्रेडिट कार्डची प्रोसेस आहे, तुम्हाला लवकरच बॅलेन्स येईल, त्यानंतर पुन्हा त्यांना 98 हजार 520 रुपये कपातीचा ओटीपी आला आणि समोरचा व्यक्ती त्यांना म्हणाला की, आता तुम्ही ओटीपी दिल्यास तुमचे पैसे परत येतील. त्यांनी ओटीपी सांगितल्यानंतर पुन्हा त्यांच्या अकाऊन्टवरून 96 हजार 457 रुपये कपात झाले. गंगणे यांच्या 3 लाख लिमिट असलेल्या अकाऊन्टवरून 2 लाख 93 हजार 508 रुपये कपात झाले. आपली फसवणूक झाल्याचे गंगणे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी 17 मार्च रोजी परली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Most Popular

error: Content is protected !!