Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडगेवराईआ.लक्ष्मण पवार यांना मातृशोक प्रमिलाताई माधवराव पवार यांचे निधन

आ.लक्ष्मण पवार यांना मातृशोक प्रमिलाताई माधवराव पवार यांचे निधन


गेवराई (रिपोर्टर) तालुक्याचे आमदार अ‍ॅड. लक्ष्मण पवार यांच्या मातुश्री प्रमिलाताई माधवराव पवार यांचे दि.18 रोजी पहाटे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले त्यांच्यावर सायंकाळी सहा वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

34a

गेवराई चे माजी आमदार स्व. माधवराव पवार यांच्या पत्नी, लोकनेते बाळराजे पवार, आमदार अ‍ॅड. लक्ष्मण पवार, श्याम बापू पवार यांच्या मातुश्री प्रमिलाताई माधवराव पवार यांल गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या त्यांच्यावर औरंगाबाद येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना शुक्रवार दि. 18 रोजी पहाटे उपचारादरम्यान निधन झाले होते. त्यांच्यावर सायंकाळी सहा वाजता आ.पवार यांच्या शेत मळ्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, आजी, माजी आमदार, संघटनेचे पदाधिकारी, डॉक्टर, वकील ,पत्रकार , आप्तेष्ट, नातेवाईकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. श्रीमती पवार यांच्या पश्चात तीन मुले, सुना, दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. दरम्यान काल दि.18 रोजी यांच्या निधनाचे वृत्त समजताच जिल्हाभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आमदार पवार यांच्या निवासस्थानी येऊन पवार कुटुंबाचे सांत्वन केले. पवार परिवाराच्या दुःखात सायं.दै.रिपोर्टर परिवार सहभागी आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!