Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeबीडकॉप्या पुरविणारे झेरॉक्स सेंटर केले सील

कॉप्या पुरविणारे झेरॉक्स सेंटर केले सील


बीड (रिपोर्टर) आज दहावीचा इंग्रजीचा पेपर होता. या दरम्यान विद्यार्थ्यांना कॉप्या पुरविण्यासाठी साक्षाळपिंप्री येथे झेरॉक्स सेंटरवर कॉप्यांच्या झेरॉक्स काढत असताना कुमावतांच्या पथकाने छापा टाकला. या वेळी झेरॉक्स सेंटर सील करून मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

दहावीच्या पेपरमध्ये कॉप्यांचा सुळसुळाट होत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात आहे. कॉप्या रोखण्यासाठी भरारी पथकांची नेमणूकही करण्यात आलेली आहे. साक्षाळपिंप्री येथील संजय पाल हे अपाल्या झेरॉक्स सेंटरवरून कॉप्या पुरवत असल्याची माहिती कुमावत यांच्या पथकाला झाल्यानंतर त्यांनी सकाळी तेथे धाड टाकली असता त्यांना दहावीच्या इंग्रजी पेपरच्या कॉप्या मिळून आल्य. त्यांनी सदरील झेरॉक्स सेंटर सील करून मालक संजय पाल यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!