Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeबीडदर्जेदार आरोग्य, शिक्षणासाठी ‘आप’ महाराष्ट्राच्या राजकारणात उतरेल दिल्लीचे सामाजिक न्यायमंत्री गौतम यांचे...

दर्जेदार आरोग्य, शिक्षणासाठी ‘आप’ महाराष्ट्राच्या राजकारणात उतरेल दिल्लीचे सामाजिक न्यायमंत्री गौतम यांचे प्रतिपादन


बीड (रिपोर्टर) केंद्र शासन देशातील नागरिकांना वेडात काढत असून समाजाला केंद्र सरकारसोबत अनेक राज्य सरकार हे जाती-जातीत विभागणी करतात, त्यातून भारताची अधोगती होते आणि देशातील समाजाची प्रगती होत नाही. दिल्लीमध्ये आम्ही शिक्षणावर एकूण राज्याच्या अर्थसंकल्पापैकी 24 टक्के रक्कम शिक्षणावर खर्च करतो.

सरकारने देशातील प्रत्येक नागरिकाला चांगले आरोग्य आणि चांगले शिक्षण दिले पाहिजे, मात्र नागरिकांना चांगले आरोग्य आणि शिक्षण मिळत नाही त्या ठिकाणी आम आदमी पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नक्कीच उतरेल, असे प्रतिपादन दिल्ली सरकारचे सामाजिक न्यायमंत्री राजेंद्रपाल गौतम यांनी माध्यमांना सांगितले.
बीड येथे ओबीसी समाजाचे दिवंगत नेते हनुमंत उपरे काका यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला सामाजिक न्यायमंत्री राजेंद्रपाल गौतम बीड येथे आले असता ते माध्यमाशी बोलत होते. घोसापुरी येथे आयोजीत कार्यक्रमात भदन्त नागार्जून, धम्मशील आणि बौद्ध धर्मातील विविध भन्तेजी यांच्या उपस्थितीमध्ये उपरे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण झाले. या वेळी माजी अपंग आयुक्त रामचंद्र गायकवाड, परभणी येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरेंसह अनेक मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना देशातील प्रत्येक नागरिकाचा हक्क हा की त्याला सरकारी पैशाने चांगले आरोग्य आणि चांगले शिक्षण मिळाले पाहिजे, दिल्ली केेंद्रशासीत प्रदेश हा अकाराने छोटा असल्यामुळे आम्ही त्याठिकाणी एकूण अर्थसंकल्पाच्या 24 टक्के रक्कम ही फक्त शिक्षणावर खर्च करतो, भारताच्या राज्य घटनेत अर्थसंकल्पाच्या 3 टक्के रक्कम ही किमान शिक्षणावर खर्च केली पाहिजे.

अशी तरतूद असताना सुद्धा एकूण अर्थसंकल्पाच्या अर्धा टक्काही रक्कम केेंद्र सरकार आणि देशातील विविध राज्य सरकार खर्च करत नाहीत. त्यांना नागरिकांना वेडात काढून दलित-आदिवासी मागास वर्गाला याची प्रगती होऊ द्यायची नाही, चांगले शिक्षण मिळाले तर सरकारला प्रश्‍न विचारणारी पिढी तयार होईल आणि याचीच भीती केंद्र सरकारसह देशातील अनेक राज्य सरकारांना आहे. त्यामुळे भविष्यामध्ये सरकारी पैशाने लोकांना चांगले आरोग्याच्या सोयीसुविधा आणि चांगले शिक्षण देण्यासाठी आम्ही महाराष्ट्राच्या राजकारणातही भविष्यात नक्की उतरू. 2024 च्या लोकसभेसाठी महाराष्ट्रातून किती जागा लढवायच्या याबाबत आताच काही सांगता येणार नाही, असेही गौतम यांनी सांगितले. बीड येथे ओबीसी समाजाचे स्मृतीशेष हनुमंत उपरे यांच्या अर्धाकृती पुतळा आणि गौरव ग्रंथाचे प्रकाशन झाले. या वेळी ओबीसी समाजातील तसेच समाजातील विविध मान्यवर उपस्थित होते. या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप उपरे यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!