Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडछ. संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामाचे ना.मुंडेंच्या हस्ते भूमिपूजन

छ. संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामाचे ना.मुंडेंच्या हस्ते भूमिपूजन


बहुप्रतीक्षीत जि.प.इमारतीचे ना. मुंडे, अब्दुल सत्तार यांच्या हस्ते लोकार्पण
बीड (रिपोर्टर) जिल्हा परिषदेच्या बहुप्रतिक्षीत इमारतीचे लोकार्पण आज राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. तत्पूर्वी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्व. गोपीनाथराव मुंडे, स्व. सुंदरराव सोळंके यांच्या पुतळ्याच्या बांधकामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

2 1


बीड जिल्हा परिषदेची भव्यदिव्य इमारतीचे बांधकाम गेल्या काही दिवसांपूर्वी पुर्ण झाले. गेल्या दोन वर्षांच्या कालखंडात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे इमारतीचे लोकार्पण होऊ शकले नाही. बहुप्रतिक्षीत इमारतीचे लोकार्पण अखेर आज राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषदेच्या पारांगणात लोकार्पण सोहळा आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्या सिरसाट, आ. प्रकाश सोळंके, आ. संदीप क्षीरसागर, आ. बाळासाहेब आजबे, आ. संजय दौंड, आ. विनायक मेटे, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जि.प.चे सीईओ अजित पवार, माजी आ. दरेकर, साठे, जि.प. उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्यासह आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या परिसरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा अश्‍वारुढ पुतळा उभा करण्यात येणार आहे. पुतळा बांधकामाचे भूमिपूजन ना. मुंडेंच्या हस्ते झाले. याच वेळी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले, स्व. गोपीनाथराव मुंडे, स्व. सुंदरराव सोळंके यांच्या पुतळ्यांच्या बांधकामाचे भूमिपूजन या वेळी झाले. इमारतीचे लोकार्पण झाल्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे.

Most Popular

error: Content is protected !!