बीड (रिपोर्टर) धुरवडी दिवशी घराबाहेर बसलेल्या एका २३ वर्षीय तरुणाचा स्वत:चा विहिरीत मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना काल उघडकीस आली. काठोकाठ भरलेल्या विहिरीतील पाणी उपसा करून रात्री तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. आज सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
शहावीर वडमारे (वय २३ वर्षे, रा. लिमगाव ता. बीड) हा तरुण धुरवडी दिवशी घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो घरी न आल्याने नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. त्यांच्या शेतातील विहिरीजवळ त्याचे कपडे आणि चप्पल आढळून आल्याने नातेवाईकांना संशय आला. त्यावरून त्यांनी विहिरीतील पाणी उपसल्यानंतर त्याचा मृतदेह आढळून आला. याची माहिती बीड ग्रामीण पोलीसांना होताच घटनास्थळी पीआय संतोष साबळे यांनी भेट देऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. आज सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.