Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeबीडअजित पवारांनी घेतली जिल्हा परिषदेच्या प्रशासक पदाची सुत्रे

अजित पवारांनी घेतली जिल्हा परिषदेच्या प्रशासक पदाची सुत्रे


ध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समिती सभापतींनी सर्वच निधी केला खर्च
बीड (रिपोर्टर) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी प्रशासक पदाचा पदभार स्वीकारला मात्र जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समितीच्या सभापतींनी मुदत संपण्या आधीच आपल्या विभागाला प्राप्त झालेला निधी खर्च केल्यामुळे या प्रशासकांना कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही आणि त्याअंतर्गत नवीन कामांना मंजुरीही देता येणार नाही.


20 मार्च 2022 रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समिती सभापती व सदस्य यांची मुदत संपली आहे. त्यामुळे राज्य शासनाने जिल्हा परिषदेवर प्रशासक नेमला आहे. बीड जिल्हा परिषदेवरही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार प्रशासक म्हणून नियुक्त झाले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती यांची मुदत संपल्याने या अध्यक्ष आणि समित्यांना धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार संपुष्टात येऊन ते प्रशासकाचे हाती एकवटल्या आहेत. त्यामुळे प्रशासकांना जिल्हा परिषद अंतर्गत कोणताही धोरणात्मक निर्णय अध्यक्ष आणि समिती ज्या प्रमाणे नवीन कामांना मंजुरी देते अशा स्वरुपाच्या मंजुरी देण्याचे अधिकारही प्रशासकांना प्राप्त होतात. मात्र अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समिती सभापती यांनी पुर्ण निधी खर्च केल्यामुळे प्रशासकाला कोणताही धोरणात्मक निर्णय किंवा नवीन कामांना मंजुरी देता येणार नाही.

Most Popular

error: Content is protected !!