Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडपोलीस विभागाच्या परिवहन विभागात सावळा गोंधळ

पोलीस विभागाच्या परिवहन विभागात सावळा गोंधळ


लांजेवार साहेब, इकडेही लक्ष द्या

बीड (रिपोर्टर) पोलीस अधीक्षक कार्यालयाअंतर्गत मोटर परिवहन विभाग कार्यरत असून या विभागाअंतर्गत जिल्ह्यातील पोलीस विभागाला देण्यात येणार्‍या गाड्या, त्या गाड्यांची दुरुस्ती आणि कर्मचार्‍यांच्या ड्युट्या हा महत्वाचा विभाग येतो. येथील प्रभारी अधिकार्‍यांनी या विभागात सुत्र स्वीकारल्यापासून सावळा गोंधळ सुरू असून या प्रभारी अधिकार्‍यांच्या कारभाराला या विभागातील सर्वच कर्मचारी वैतागले आहेत.
या विभागाचा पदभार घेतलेले अधिकारी गाड्या दुरुस्त करणार्‍या एजन्सीकडूनही मलई खातात. जे काही थोडेफार देतील अशा कर्मचार्‍यांना सोयीच्या ठिकाणी पोस्टींग देणे, ज्या ठाण्याला गाडीची गरज नाही, अशा ठाणे अमलदारांनी हितगुज साधले की त्यांना गाडीची व्यवस्था करून देणे अशा स्वरुपाचा मर्जीचा कारभार प्रभारी अधिकारी, हजेरी मस्टर प्रमुख आणि इन्चार्ज यांनी लावला आहे. याही बाबीकडे प्रभारी पोलीस अधिक्षक लांजेवार यांनी लक्ष द्यावे आणि या विभागातील सावळा गोंधळ दूर करावा.

Most Popular

error: Content is protected !!