Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडआशिर्वाद कॉलनीत घाणीचे साम्राज्य

आशिर्वाद कॉलनीत घाणीचे साम्राज्य


बीड (रिपोर्टर) शहरातील सांगली बँकेच्या पाठीमागील आशिर्वाद कॉलनीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून नाल्या काढल्या नसल्यामुळे त्या तुंबल्या असून नालीचे घाण पाणी रस्त्यावर येत आहे. यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी सुटली असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या घाणीमुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता असल्याने येथील नाल्या तात्काळ साफ करून धुरफवारणी करावी अशी मागणी येथील नागरिकातून होत आहे.

शहरात कचर्‍याचा प्रश्‍न कायम आहे. आशिर्वाद कॉलनीत कचरा कुंडी नाही. घंटागाडी वेळेवर येत नाही. त्यामुळे सांगली बँक परिसरातील व्यापारी रोजचा कचरा या नाल्यात टाकतात. त्यामुळे येथील नाली तुंबल्याने पाणी आशिर्वाद कॉलनीतील रस्त्यावर येत आहे. त्यामुळे प्रचंड दुर्गंधी सुटली असून डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यासंदर्भात येथील नागरिकांनी नगरपालिकेला निवेदन दिले मात्र अद्यापही नाल्या साफ झाल्या नाहीत. घंटागाडीही वेळेवर येत नाही. घंटागाडी सायरन वाजवत नसल्याने केव्हा येते अन केव्हा जाते हे ही नागरिकानां कळत नाही. त्यामुळे व्यापारी कचरा घंटागाडीत न टाकता सांगली बँक कॉर्नरच्या नालीत टाकतात. त्यामुळे त्याठिकाणी नाली तुंबल्याने आशिर्वाद कॉलनीत नालीचे पाणी रस्त्यावरून येवून प्रचंड दुर्गंधी सुटत आहे. या घाणीमुळे येथे मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या डासांमुळे साथीचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगरपालिका प्रशासनाच्यावतीने कचरा नालीत टाकणार्‍या व्यापार्‍यांवर कडक कारवाई करून घंटागाडी नियमीत पाठवावी आणि तुंबलेल्या नाल्या साफ कराव्या अशी मागणी आशिर्वाद कॉलनीतील नागरिकांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!