शॉर्ट सर्किटमुळे घडली घटना
गेवराई (रिपोर्टर) यंदा अतिरिक्त उसाचा गंभीर प्रश्न बनला असतानाच महावितरणच्या गलथान कारभारामुळे शॉर्ट सर्किटचे प्रमाण वाढले आहेत. गोविंदवाडी येथे दोन सख्ख्या भावांच्या तीन एकर उसाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यामुळे त्यात मोठे नुकसान झाले. नुकसान भरपाईची मागणी शेतकर्यांमधून होत आहे.
तालुक्यातील गोविंदवाडी येथील भास्कर रंभाजी वाघमोडे, दीपक रंभाजी वाघमोडे यांचा तीन एकरमधील उसाला शॉर्ट सर्किटने आग लागून ऊस जळून खाक झाला. यामध्ये शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अगोदरच ऊसतोडणीची तारीख निघून गेली असल्याने उसाचे वजन मोठ्या प्रमाणात घटलेले आहे. त्यात पुन्हा शॉर्ट सर्किटने आग लागल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.