बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत गेल्या काही दिवसापासून चर्चा सुरू होत आहे. कायदा सुव्यवस्था ढासळल्याने पोलिस अधिक्षक राजा स्वामी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले आहे. आज औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक मल्लिकार्जून प्रसन्ना हे बीड येथे आले असून त्यांनी सर्व पोलिस अधिकार्यांची बैठक बोलावली. सदरील ही बैठक कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात खुन, दरोडे, मारामार्या या घटनात वाढ झाली आहे. कायदा सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यास तत्कालीन पोलिस अधिक्षक राजा रामास्वामी यांना अपयश आल्याने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.
आज औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक मल्लिकार्जून प्रसन्ना हे बीड येथे आले आहेत. त्यांनी बीडमध्ये दाखल होताच शहर पोलिस ठाण्याला भेट देत तेथील कर्मचार्यांशी संवाद साधत अडीअडचणी समजून घेतल्या. बीड शहर पोलिस ठाण्याच्या नोंदी पाहत सगज आणि सतर्क राहत काम करा, आलेल्या व्यक्तीचे समाधान करा अशा सुचना दिल्या. त्यानंतर त्यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली. या बैठकीला जिल्ह्यातील अतिरिक्त पोलिस अधिक्षक, पोलिस उपअधिक्षक, पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक यासह अन्य महत्वाचे अधिकारी उपस्थित होते.