Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडबीड जिल्ह्यात उद्या भगवा झंझावात शिवसंपर्क अभियानाला उपस्थित रहा- जिल्हाप्रमुख अनिल जगताप...

बीड जिल्ह्यात उद्या भगवा झंझावात शिवसंपर्क अभियानाला उपस्थित रहा- जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांचे आवाहन


बीड (रिपोर्टर)- पंचायत समिती ते पार्लमेंट भगवा झंझावात निर्माण करण्यासाठी शिवसेनेच्या संघटनेला बळकटी देण्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये आयोजित शिवसंपर्क अभियान अंतर्गत आज बुधवार रोजी गेवराई, पाटोदा, बीड येंथे शिवसैनिकांचा मेळावा होत आहे. या शिवसंपर्क अभियानाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी केले आहे.


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार मराठवाडा संपर्वै नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख आनंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या बीड, गेवराई, आष्टी या तीन विधानसभा मतदारसंघातील पाच तालुक्यात एकाचवेळी आज शिवसंपर्वै अभियान राबवले जात आहे. गाव तिथे शिवसेनेची शाखा आणि घर तिथे शिवसैनिक हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पंचायत समिती ते पार्लमेंट भगवा झंझावात निर्माण करण्यासाठी हे अभियान राबवले जात आहे. शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत दहा सदस्यांची टिम यात सहभागी आहे. आज होणाछया शिवसंपर्वै अभियानात ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. शिवसेना पदाधिकारी विजय भोसले, उदय रूघानी, अजित भंडारी, प्रकाश महादळकर, संजय शिगरे, शेखर शिर्रसकर, विघ्ने सुंदर, बबन काळे, विलास राणे, विजय देशमुख, राजू फोंडकर यांची उपस्थिती लाभणार आहे. बुधवारी सकाळी दहा वाजता गेवराई येथे बेद्रे मंगल कार्यालयात दुपारी एक वाजता पाटोदा येथील पीव्हीपी कॉलेजमध्ये तर सायंकाळी सहा वाजता बीड येथील सुर्या लॉन्स येथे मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याला शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी केले आहे.

Most Popular

error: Content is protected !!