Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeन्यूज ऑफ द डेनरभक्षक बिबट्याला ठार करण्याचे आदेश

नरभक्षक बिबट्याला ठार करण्याचे आदेश

0
बीड/आष्टी (रिपोर्टर);- आष्टी तालुक्यामध्ये धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्या कर्जत परिसरामध्ये गेला आहे. त्या ठिकाणीही त्याने लोकांचा बळी घेतला. या बिबट्याचा शोध आष्टी हद्दीमध्ये घेण्यात आला. मात्र तो सापडलेला नाही. आता सध्या कर्जत परिसरामध्ये त्याचा शोध सुरू आहे.

बिबट्याला मारण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, आ.सुरेश धस, आ.बाळासाहेब आजबे, माजी आ.भीमराव धोंडे यांनी केली होती. याची दखल घेत बिबट्याला ठार मारण्याचे आदेश वन्य जीव रक्षक तथा प्रधान मुख्य वन संरक्षक नितीन काकडकर यांनी संबंधित विभागाला दिली आहे.


गेल्या काही दिवसापासून नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला होता. त्याने तीन जणांचा बळी घेतला. त्याच्या शोधार्थ अनेक पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. हे पथक रात्रन दिवस त्याचा शोध घेत होतेे. मात्र तो पथकाच्या हाती लागला नाही. तीन दिवसापूर्वी सदरील नरभक्षक बिबट्या कर्जत परिसरामध्ये गेला. त्या ठिकाणीही त्याने लोकांचा बळी घेतला. त्यामुळे त्या परिसरातील नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले. या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची परवानगी द्यावी अशी मागणी बीडचे पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आ.सुरेश धस, आ.बाळासाहेब आजबे, माजी आ.भीमराव धोंडे यांनी केली होती. त्यानुसार बिबट्यास ठार करण्याचे आदेश मुख्य वन्य जीव संरक्षक तथा मुख्य वन संरक्षक नितीन काकडकर यांनी दिले आहे.

Most Popular

error: Content is protected !!