२०० ब्रास वाळुसह सहा हायवा जप्त, चार मजुरांच्या आवळल्या मुसक्या
गेवराई (रिपोर्टर) बीड जिल्ह्यात सध्या एकही वाळू घाट नाही, तरी देखील गोदा पात्रासह सिंदफणा नदीतून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. आज पहाटे पाच वाजल्यापासून साडेबारापर्यंत कुमावतांच्या पथकाने गेवराई तालुक्यातील सावरगाव, राक्षसभुवन आणि खामगाव येथे छापे टाकून तब्बल २०० ब्रास वाळू जप्त केली. या वेळी वाळुने भरलेले तीन हायवा तर वाळू भरत असताना एक हायवा जप्त केला.
बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. याकडे स्थानिक पोलीस दुर्लक्ष करत असल्याचे वेळोवेळी कुमावतांच्या पथकाने मारलेल्या धाडीतून दिसून येते. पहाटे सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांना सावरगाव, राक्षसभुवन आणि खामगाव येथे वाळूसाठा करून ठेवल्याची माहिती स्थानिकांनी दिली होती. त्यानंतर त्याठिकाणी पथकातील बालाजी दराडे यांच्यासह अन्य पोलीस कर्मचार्यांनी छापे टाकून २०० ब्रास वाळू साठा जप्त केला तर वाळुने भरलेले तीन हायवा आणि एक वाळू भरत असताना असे चार हायवा जप्त के ले. पुढील कारवाईसाठी ते गेवराई पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहेत. वाळूसह हायवा असा एकूण १ कोटी २ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.