Tuesday, May 17, 2022
No menu items!
HomeUncategorizedभूसंपादीत केलेल्या जमिनीतील झाडे, बोअरचा मावेजा द्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकर्‍यांचे आंदोलन

भूसंपादीत केलेल्या जमिनीतील झाडे, बोअरचा मावेजा द्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकर्‍यांचे आंदोलन


बीड (रिपोर्टर) पाटोदा तालुक्यातील कोतन, कारेगाव या गावातील शेतकर्‍यांची जमीन रेल्वेसाठी संपादीत करण्यात आली. या जमिनीत बहुतांश शेतकर्‍यांचे झाडे, बोअर, पवळ होती. याचा मावेजा भूसंपादन कार्यालयाने दिला नसून तो तात्काळ देण्यात यावा या मागणीसाठी शेतकर्‍यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे.
गेल्या काही वर्षापूर्वी परळी, बीड, नगर रेल्वेमार्गासाठी जमिन संपादीत करण्यात आली. पाटोदा तालुक्यातील कारेगाव, कोतन येथील शेतकर्‍यांचीही जमिन संपादीत झाली असून यामध्ये बहुतांश शेतकर्‍यांचे बोअर, विहिरी, झाडे संपादीत करण्यात आलेले आहेत. याचा मावेजा त्यांना भूसंपादन विभागाने दिलेला नाही. या मावेजासाठी शेतकर्‍याने अनेकवेळा पाठपुरावा केला. मात्र याची दखल संबंधीत विभाग घेत नसल्याने आज अनेक शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. यावेळी सय्यद रौफ, सय्यद सादीक, सय्यद शाहीद, सय्यद इस्माईल, सय्यद जुबेर, भगवान मिसाळ, भागवत जेधे, विठ्ठल भगत, अभिमान निळकंठ, रावसाहेब निंबाळकर, प्रभू निंबाळकर सह आदि शेतकर्‍यांचा या आंदोलनामध्ये सहभाग आहे.

Most Popular

error: Content is protected !!