Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeबीडशिरूरनवगण राजुरी ते चिंचपूर हायवे रस्ता दोन वर्षापासून खोदून ठेवला , ...

नवगण राजुरी ते चिंचपूर हायवे रस्ता दोन वर्षापासून खोदून ठेवला , आ. आजबे, आ. क्षीरसागरांनी लक्ष घालावे


अर्धवट कामामुळे वाहनधारकांना होवू लागला त्रास; आ.आजबे,आ.क्षीरसागरांनी लक्ष घालावे; रस्त्याचे काम तात्काळ न केल्यास नागरिक रस्त्यावर उतरणार
बीड (रिपोर्टर) नवगण राजुरी ते चिंचपूर या दरम्यान हायवे रस्त्याचे काम करण्यासाठी रस्ता गेल्या दोन वर्षापासून खोदून ठेवण्यात आला. या रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. रस्ता अपूर्ण असल्यामुळे याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागतो. या अर्धवट रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले. रस्ता पूर्ण करण्यासाठी आष्टी मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे व बीड मतदार संघाचे आमदार संदिप क्षीरसागर यांनी लक्ष घालावे आणि रस्ता तात्काळ पूर्ण करून घ्यावा अशी मागणी योगेश जाधव यांनी केली आहे.


नवगण राजुरी ते शिरूर कासार यादरम्यान राज्य महामार्गाचे काम सुरू करण्यात आले. दोन वर्षापूर्वी रस्ता खोदून ठेवण्यात आला. नुसताच रस्ता खोदून ठेवला, त्याच्या पुढील काम अद्यापही करण्यात आले नाही. रस्ता खोदल्यामुळे वाहनधारकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. छोटे मोठे अपघात खोदकामामुळे होवू लागले. या रस्त्याने शालेय विद्यार्थी, रूग्ण, वयोवृध्द, व्यावसायीक नेहमीच ये जा करत असतात. त्यांना खराब रस्त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान हा रस्ता तात्काळ दुरूस्त करण्याच्या सूचना संबंधीत विभागाला द्याव्यात व या रस्तयाच्या कामाकडे आष्टी,पाटोदा,शिरूर मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे आणि बीड मतदार संघाचे आमदार संदिप क्षीरसागर यांनी लक्ष घालावे. नसता या रस्त्याच्या संदर्भात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा योगेश जाधव, योगेश तांबारे, सचिन जाधव, जालिंदर नेमाने, जनार्दन मंडलिक, राहूल जाधव, कोल्हे दिपक, मोरे ओमकार, अंकुश गायकवाड, सानप कृष्णा, सर्फराज पठाण, मिसाळ महादेव, खदीर शेख, शेख अन्सार, शेषेराव नागरे, सूर्यकांत वीर, सतिष वीर, वारे विकास, उमर शेख, फेरोज तांबोळीसह आदिंनी दिला आहे.

Most Popular

error: Content is protected !!