गेवराई (रिपोर्टर) शिवसेना पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूकीच्या अनुषंगाने शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान सुरू आहे. हे अभियान आज गेवराई येथे होते यावेळी खा.ओमराजे निंबाळकर यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. व्यासपिठावर माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी आ.बदामराव पंडित, जिल्हाप्रमुख अनिल जगताप, जाधव, आंबुरेसह आदिंची उपस्थिती होती.
शिवसेनेची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने शिवसंपर्क अभियान सुरू आहे. हे अभियान आज गेवराईमध्ये आयोजीत करण्यात आले होते. या कार्यक्रमाला खा.ओमराजे निंबाळकर यांनी मार्गदर्शन केले. व्यासपिठावर माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी आ.बदामराव पंडित, जिल्हाप्रमुख अनिल जगताप, अजित भंडारी, बाळासाहेब आंबुरे, आप्पासाहेब जाधव, सचिन मुळूक, सागर बहिर, संगिता चव्हाण, युध्दाजित पंडित, परमेश्वर सातपुते, बप्पासाहेब घुगे, नितीन धांडे, बबलू खराडे, शेख एजाज, कालिदास नवले, अजय दाभाडे, रोहित पंडित, सुनिल सुरवसे, उज्वला भोपळे, दिनकर शिंदे, शिनू बेदरे, शेखर शिंदे, विठ्ठल नांदेसह आदिंची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.