बीड (रिपोर्टर) जिल्ह्यात आयजी असताना लाच घेण्याची हिमत पोलिस प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी करत आहे. काल दहा हजाराची लाच स्विकारताना केज तालुक्यातील आडस येथे धारूर ठाण्याचा पोलिस कर्मचारी एसीबीने रंगेहात पकडला. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तेजस सावळे असे लाच घेणार्या पोलिस कर्मचार्याचे नाव आहे. तो धारूर पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. केज तालुक्यातील आडस येथील चौकीत एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी आरोपीकडून त्याने दहा हजाराची लाच स्विकारताना काल एसीबीने त्याला रंगेहात पकडले होते. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.