Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडराज्यात ईडीच्या कारवाया द्वेष भावनेतून बीडमध्ये आघाडीचा धर्म पाळला जावा -खा. ओमराजे

राज्यात ईडीच्या कारवाया द्वेष भावनेतून बीडमध्ये आघाडीचा धर्म पाळला जावा -खा. ओमराजे

बीड (रिपोर्टर)- इथं नवरा-बायकोंमध्ये कधी कधी मतभेद निर्माण होतात हे राजकारण आहे, काहींचे मतभेद असू शकतात. परंतु जिथं शिवसेनेचा पालकमंत्री आहे तितं आम्ही आघाडीचा धर्म पाळतो इथे मात्र आघाडीचा धर्म पाळला जात नसल्याचा पुनरुच्चार करत अन्याय सहन करणार नसल्याचे सांगून आघाडीचा धर्म पाळला जावा, अशी अपेक्षा व्यक्त करत खा. ओमराजे निंबाळकर यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना द्वेषपूण भावनेतून ईडीच्या कारवाया सुरू असल्याचे सांगत भाजप सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप करत बीडसह मराठवाड्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्‍न गंभीर असल्याचे सांगून जोपयर्ंत सगळा ऊस गाळप होत नाही तोपर्यंत कारखाने बंद होऊ देणार नसल्याचे सांगून याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करत असल्याचे ओमराजेंनी म्हटले.


ते बीडमध्ये बोलत होते. आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदे दरम्यान त्यांच्या सोबत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी मंत्री बदामराव पंडित, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, माजी जिल्हाप्रमुख सचीन मुळुक, कुंडलिक खांडे, गणेश वरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी ओमराजे निंबाळकर म्हणाले की, मराठवाड्यातील वॉटर ग्रीड योजना ही पैशाच्या अडचणीमुळे पुढे जात नसल्याचे स्पष्ट सांगत या योजनेसाठी मराठवाड्यातील सर्वपक्षीय नेते सक्रिय नसल्याची खंतही व्यक्त केली. मात्र ही योजना पुर्णत्वास नेण्यासाठी शिवसेना प्रयत्न करणार असून जे पाणी समुद्राला वाहून जातं ते मराठवाड्याला वळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगून मराठवाड्यातला पाणीप्रश्‍न मिटला तर आमच्या येथील शेतकरी पश्‍चिम महाराष्ट्राच्याही पुढे जाईल. इथं नवरा-बायकोचे भांडणे होतात तसे आघाडीमध्ये काही मतभेद असू शकतात, ही कबुली देत बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून आघाडीचा धर्म पाळला जात नसल्याचा पुनरुच्चार केला.
शिवसेनाप्रमुखांनी मुंबईमध्ये शिवसेनेची बांधणी ज्याप्रमाणे केली त्यामुळेच मुंबई महानगरपालिका कायमस्वरुपी शिवसेनेच्या ताब्यात राहिलेली आहे. मुंबई मनपाच्या तटबंदीला हात घालण्याची कोणाची हिंमत झाली नाही. अनेकांनी अनेक वल्गण्या केचल्या मात्र त्यांचे मनसुबे हे अपयशी गेले आहेत. त्याच धर्तीवर ग्रामीण भागामध्ये शिवसेनेची (पान 7 वर)
बांधणी करण्यासाठी हे अभियान आहे. बुथप्रमुख, शाखाप्रमुख , पंचायत समिती गण, जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ते या सर्वांची बांधणी या अभियानातून करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी बुथप्रमुख किंवा अन्य पक्षातील पद रिक्त असेल ते रिक्त असलेले पदही भरण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. कार्यकर्त्यांच्या म्हणण्यासोबतच जनमाणसांच्या काय अपेक्षा आहेत याचाही कानोसा या अभियानातून घेण्यात येत आहे. शिवसंपर्क अभियाना दरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी काही प्रश्‍न उपस्थित केले आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना निधी किंवा इतर बाबींबाबतीत काही सूत्र ठरलेले आहेत. त्या सूत्रप्रमाणे कामकाज होत नसल्याच्या तक्रारीही अनेक कार्यकर्त्यांनी केल्या. याबाबतही पक्षप्रमुखांना ही बाब लक्षात आणून देण्यात येईल. निधी वाटपात जे कोणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारात कोणी हस्तक्षेप करत असेल तर तेही पक्षप्रमुखांच्या लक्षात आणून दिले जाईल. शिवसेना हा पक्ष सामान्य माणसांचे प्रश्‍न सोडवणारा पक्ष आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारकडून हातात हात घालूनच काम केले जाईल आणि सामान्य माणसांचे प्रश्‍न सुटले जातील याकडेच प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले जाईल, असेही निंबाळकर यांनी सांगितले.

नगरपालिकेची निवडणूक स्वतंत्र लढणार -जयदत्त क्षीरसागर
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम यंत्रणेने करावे
गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या निवडणुका झालेल्या आहेत. प्रत्येक पक्षाने त्या स्वतंत्रपणे लढलेल्या आहेत. त्याच धर्तीवर बीड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या निवडणुका लढवल्या होत्या त्याच धर्तीवर नगर परिषद निवडणुका लढवल्या जातील. जिल्ह्यामधील कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे. दारू, मटका, गुटका आणि वाळू या धंद्यातील माफिया प्रामुख्याने हे काम करतात त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखणार्‍या यंत्रणेने आपली जरब बसवून दोषींवर कारवाई करावी, असे या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेचे नेते जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!