Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeक्राईमतिसर्‍या मजल्यावरुन फेकून विवाहितेचा खून, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सासरच्यांविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल,...

तिसर्‍या मजल्यावरुन फेकून विवाहितेचा खून, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सासरच्यांविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल, आज सकाळी घडली घटना



बीड । रिपोर्टर
बीड: सहा महिन्यापूर्वी लग्न झालेल्या एका 20 वर्षीय विवाहितेला तिसर्‍या मजल्यावरून फेकून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना बीड शहरातील शाहूनगर भागात गुरुवारी सकाळी सात वाजता घडली. या प्रकरणी आरोपावरून पती, दीर व जाऊविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यासमीन शकूर शेख (वय 20 वर्षे, रा. शाहूनगर, बीड) असे मयत विवाहितेचे नाव आहे. तिचे वडील रहीम शरिफोद्दिन शेख (रा. इस्लामपुरा, पेठ बीड) यांच्या तक्रारीनुसार, 26 ऑक्टोबर 2021 रोजी तिचा विवाह शकूर बशीर शेख (29) याच्याशी लावला होता. शकूर हा मिस्त्रीकाम करतो. लग्न होऊन एक महिना उलटल्यानंतर यासमीनला सासरी जाच होण्यास सुरुवात झाली. गुरुवार दि. 24 रोजी सकाळी 7 वाजता ती घराच्या तिसर्‍या मजल्यावरून खाली पडली असल्याचा निरोप सासरच्या लोकांनी दिला. त्यावरून ते तत्काळ तिच्या घरी पोहोचले. यासमीनला तिसर्‍या मजल्यावरून फेकून संपविल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावरून पती शकूर बशीर बेग, दीर शेख नसीर बशीर, जाऊ सोफेया नसीर शेख विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक बाळराजे दराडे करत आहेत.

01


पती ताब्या
घटनेची माहिती मिळताच बीडचे पोलिस उपाधीक्षक संतोष वाळके, शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक केतन राठोड, उपनिरीक्षक बाळराजे दराडे यांच्यासह कर्मचार्‍यांनी सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी पती शेख शकूर यास ताब्यात घेतले आहे. या घटनेची माहिती शहरात वार्‍यासारखी पसरताच नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालय, पोलीस ठाण्यासह घरी गर्दी केली होती.

Most Popular

error: Content is protected !!