Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडजिल्ह्यात शिवसेनेची ताकद कमी उपअभियंत्याच्या त्या व्हिडीओवर जोरदार चर्चा

जिल्ह्यात शिवसेनेची ताकद कमी उपअभियंत्याच्या त्या व्हिडीओवर जोरदार चर्चा


बीड (रिपोर्टर) अंबाजोगाईच्या सार्वजनिक बांधकामाचे कार्यकारी अभियंत्याने पिस्तूल परवाना मागितल्याचे प्रकरण चर्चेत असतानाच बीडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते बोराडे यांनी उधळलेल्या मुक्तफळांचा व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये नौकरी करायची म्हणजे सगळ्यांना पैसे द्यावेच लागतात. तेवढे निघतही नाहीत. जिल्ह्यात शिवसेनेची ताकद कमी झाली आहे. अशा आशयाचे वक्तव्य केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत असल्याने पून्हा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तेथील अधिकार्‍यांची चर्चा जिल्ह्यात वाढली आहे.


बीड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता बोराडे यांची एक व्हिडीओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओ क्लिपमध्ये बोराडे एका शिवसैनिकाशी बोलत असल्याचे दिसून येते. आम्हाला कामे हवे आहेत, तुम्ही आम्हाला कामे देत जा, असे तो शिवसैनिक अथवा पदाधिकारी बोराडेला म्हणतो तेव्हा बोराडे संबंधीत पदाधिकार्‍यास शिवसेनेची ताकद आता पहिल्यासारखी राहिली नाही. धांडे सरांच्या काळात शिवसेनेचा जोर होता, आता तो नाही, आम्हाला या पदावर येण्यासाठी पैसे द्यावे लागतात. नौकरी करताना सर्वांनाच सांभाळून घ्यावे लागते. लोकप्रतिनिधींनाही पेसे द्यावे लागतात. असे मुक्तफळे उधळतानाच तो व्हिडीओ सध्या शहरात चर्चेचा विषय होवून बसला आहे. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना शिवसैनिकासमोर अथवा पदाधिकार्‍यासमोर शिवसेना पक्षाच्या ताकदीवर हा अभियंता बोलत असल्याने त्याला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. बोराडेंचे दोन व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येते. एक 28 सेकंदाचा तर एक दीड मिनिटापेक्षा अधिक असल्याचेही नेटकर्‍यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!