गेवराई (रिपोर्टर) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा आणि त्याची वाहतूक होत आहे. यात गेवराई तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू माफिया सक्रिय आहे. ते स्थानिक पोलिसांच्या मदतीने रात्री एसपींच्या पथकाने हिंगणगाव येथील गोदापात्रात छापा टाकून वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर, एक हायवा आणि एक लोडर असा लाखोंचा मुद्देमाल जप्त केला.
गेवराई तालुक्यात वाळु माफियांनी उच्छाद् मांडला आहे. रोज हजारो ब्रास वाळू सर्रासपणे उपसली जाते. याकडे गेवराई, चकलांबा आणि तलवाडा पोलीस अर्थपुर्ण दुर्लक्ष करत असल्याचे कुमावत आणि एसपींच्या पथकाने केलेल्या कारवाईतून निदर्शनास येत आहे. बीडहून जाणार्या एसपींच्या पथकाला आणि केजहून कुमावतांच्या पथकाला गेवराईतील वाळू माफिया दिसतात, मात्र स्थानिक पोलिसांच्या नजरेतून ते कसे सुटतात? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. रात्री गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील नदी पात्रातून वाळू उपसा होत असल्याची माहिती एसपींचे पथकप्रमुख गणेश ढोकरट यांना मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या सहकार्यांसह छापा मारला असता त्याठिकाणी वाळुने भरलेले दोन ट्रॅक्टर, एक हायवा आणि एक लोडर मिळून आले. त्यांनी ते जप्त करून पुढील कारवाईसाठी गेवराई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सदरील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश ढोकरट, पो.ना. गणेश धनवडे, पोलीस अंमलदार गोविंद काळे, अभिजीत दहिवाळ यांनी केली.