बीड (रिपोर्टर) गेल्या चार ते पाच महिन्यांपासून बंद असलेली इंधन दरवाढ पाच राज्यातील निवडणुका संपताच पुन्हा सुरु झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रत्येकी 80 पैशांची वाढ केली. मागील चार दिवसांच्या कालावधीत झालेली ही तिसरी इंधन दरवाढ आहे. ताज्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचे प्रती लीटरचे दर 97. 81 रुपयांवर तर डिझेलचे दर 89. 07 रुपयांवर पोहोचले आहेत .राज्यात पेट्रोलच्या भावाने शंभरी केंव्हाच पार केली असून बीडमध्ये पेट्रोलचे भाव 113 रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत तर डिझेल 96 रुपयावंर गेले आहे आणखी काही दिवस दरवाढ होणार असल्याचे सांगण्यात येते.
गेल्या 4 दिवसांपासून सुरू झालेला इंधन दरवाढीचा भडका आजही कायम आहे. आज शुक्रवारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात 80 पैशांनी तर डिझेलच्या दरात 75 पैशांनी वाढ केली आहे. आजपासून नवे दर लागू झाले आहेत. सततच्या इंधन दरवाढीमुळे गेल्या चार दिवसांत पेट्रोल तब्बल 2 रुपये 40 पैशांनी महागले आहे. आता मुंबईत पेट्रोल 112.51 रुपये/लिटर आणि डिझेल 96.70 रुपये/लिटर मिळणार आहे. मागील 4 दिवसांत पेट्रोल-डिझेलमध्ये झालेली हि तिसरी दरवाढ आहे. त्यामुळे सामान्यांकडूनही आता संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
देशभरातील महानगरांच्या तुलनेत मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहे. तसेच, राज्यातील शहरांमध्येही पेट्रोल सर्वाधिक महागडे आहेत. त्यामुळे राज्यातील नागरिकांना या दरवाढीची सर्वाधिक झळ बसणार आहे. देशभरात पेट्रोलचे दर 97 ते 98 रुपयांच्या आसपास आहे. मात्र, मुंबईसह राज्यातील सर्व शहरांमध्ये पेट्रोलचे प्रतिलिटर दर 112 रुपयांच्या पुढे गेले आहे. आज झालेल्या दरवाढीनंतरही दिल्लीत पेट्रोल 97.81 रुपये/लिटर आणि डिझेल 89.07 रुपये/लिटर मिळत आहे. तर अहमदाबादमध्ये पेट्रोल 97.52 रुपये/लीटर आणि डिझेल 91.61 रुपये/लीटर झाले आहे. या शहरांमध्ये पेट्रोलचे दर राज्यातील दरापेक्षा 3 रुपयांनी कमी आहे. बीड जिल्हात पेट्रोल तब्बल 113 रुपयावर जाऊन पोहचले आहे तर डिझेल चे दर 96 रुपयावर जाऊन पोहोचले आहेत . पाच राज्यातील निवडणुका संपल्या निकालात भाजपाचा वरचष्मा असला तरी इंधनदारवाढ रोखण्यात केंद्रातील भाजपा सरकारला अपयश येत आहे . दुसरीकडे मात्र दरवाढीने सर्वसामान्य जनतेत संताप व्यक्त केला जात आहे.