Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeक्राईमकुमावत यांच्या पथकाची भेसळयुक्त दुधावर धाड चार पोते पावडर जप्त, 160 लिटर...

कुमावत यांच्या पथकाची भेसळयुक्त दुधावर धाड चार पोते पावडर जप्त, 160 लिटर दूध केले नष्ट


बीड (रिपोर्टर) पावडरपासून दूध बनवून ते डेअरीला विक्री होत असल्याची माहिती कुमावतांच्या पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी पाटोदा तालुक्यातील नागेवाडी येथे धाड टाकली असता दूध बनवण्यासाठी आणलेले 50 हजाराचे पावडर जप्त केले. या प्रकरणी आप्पासाहेब हरीभाऊ थोरवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया दुपारी सुरू होती.

भेसळयुक्त दूध आणि खवा बीडमध्ये मोठ्या प्रमाणात बनवला जात असल्याची ओरड होत आहे. पाटोदा तालुक्यातील नागेशवाडी येथे एक जण पावडरपासून दूध बनवून आणि काही गाय, म्हशीचे दूध अशी भेसळ करून ते त्याचा पुरवठा दूध डेअरीला करत असल्याची माहिती कुमावत यांच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून त्यांनी आज सकाळी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी धाड टाकली असता 160 लिटर बनावट दूध आणि दूध बनवण्यासाठी आणलेली नंदियाल कंपनीची चार पोते पावडर असा 50 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आप्पासाहेब हरिभाऊ थोरवे हा गाय, म्हशीचे दूध आणि त्यात ही पावडर टाकून दुधाची भेसळ करत होता. ते दूध दूध डेअरीसह इतरत्र पुरवठा रोज करत होता. याठिकाणी कुमावत यांच्या पथकाने धाड टाकून भेसळयुक्त दुधाचा गोरख धंदा उद्ध्वस्त केला. ही कारवाई कुमावतांच्या पथकातील बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, विकास चांदणे, राजू वंजारे, महिला पोलीस नाईक आशा चौरे, इमरान हाशमी यांच्यासह अन्न व औधे प्रशासन विभागातील महेंद्र गायकवाड, उमेश कांबळे यांनी केली.

Most Popular

error: Content is protected !!